JOIN US
मराठी बातम्या / विदेश / माजी पंतप्रधानांची हत्या होण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; शहरात कलम 144 लागू

माजी पंतप्रधानांची हत्या होण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; शहरात कलम 144 लागू

पोलिसांच्या प्रवक्त्यानं शनिवारी सांगितलं की, शहरात आधीच कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि सभांवर बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 05 जून: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Pakistani Prime Minister Imran Khan) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवांमुळे इस्लामाबाद पोलीस विभागानं Islamabad Police Department) शहराच्या लगतच्या बनी गालामधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर (High Alert) ठेवलं आहे. इस्लामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्यानं शनिवारी सांगितलं की, शहरात आधीच कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि सभांवर बंदी घालण्यात आली आहे. इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट केलं की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांचे बनी गाला येथे संभाव्य आगमन लक्षात घेता, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांच्या टीमकडूनन परतल्याची कोणतीही पुष्टीचं वृत्त मिळालेलं नाही. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत मोठी चूक, No Fly Zone मध्ये घुसलं विमान अन्… इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा विभागाने बनी गाला येथे विशेष सुरक्षा तैनात केली आहे. तसंच बनी गालामधील लोकांची यादी अद्याप पोलिसांना उपलब्ध झालेली नाही. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू आहे आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोणत्याही सभांना परवानगी नाही. इम्रान खानला पूर्ण सुरक्षा देणार - पोलीस पोलिसांनी पुढे सांगितले की, इस्लामाबाद पोलीस कायद्यानुसार इम्रान खानला संपूर्ण सुरक्षा पुरवतील आणि इम्रान खानच्या सुरक्षा पथकांकडूनही परस्पर सहकार्य अपेक्षित आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रमुखाला काही झाले तर ते पाकिस्तानवरील हल्ला मानले जाईल, असे इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या घटनेकडे पाकिस्तानवर हल्ला म्हणून पाहिले जाईल आणि प्रतिक्रिया आक्रमक असेल, ज्यांनी केलं त्यांना पश्चात्ताप होईल. हत्येच्या अफवेची माहिती यापूर्वीही एजन्सींनी दिली होती यापूर्वी फवाद चौधरी यांनी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान रविवारी इस्लामाबादला येत असल्याचं सांगितलं होतं. चौधरी यांनी एप्रिलमध्ये सांगितलं की, देशाच्या सुरक्षा संस्थांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने त्यांचा हवाला देत म्हटले आहे की, या वृत्तांनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पंतप्रधानांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते फैसल वावडा यांनी दावा केला होता पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते फैसल वावडा यांनीही देश विकण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला. पत्रात पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा संदर्भ देत वावडा म्हणाले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता, पण टाळाटाळ करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, इम्रान खान यांना इस्लामाबादमधील परेड ग्राउंडवर रॅलीमध्ये बुलेटप्रूफ गॉगल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या