मुंबई, 7 जुलै : अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) आणि त्यांच्याच एका कंपनीतील वरिष्ठ अधिकारी यांना दोन जुळी मुलं असल्याचं उघड झालं आहे. ‘बिझनेस इन्सायडर’ च्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. शिवॉन झिलिस (Shivon Zilis) असं या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे. यामुळे एलॉन मस्क यांच्या एकूण मुलांची संख्या नऊवर (Elon Musk children) गेली आहे. एलॉन मस्क आणि कॅनडियन सिंगर ग्राईम्स (Grimes) या दोघांना दोन मुलं आहेत. तसंच, मस्क आणि त्याची पूर्वीची पत्नी जस्टिन विल्सन (Justine Wilson) यांना एकूण पाच मुलं आहेत. मस्क आणि ग्राईम्स यांनी सरोगसीच्या माध्यमातून 2021च्या डिसेंबरमध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मात्र, त्यापूर्वीच मस्क आणि शिवॉन यांच्या जुळ्या मुलांचा जन्म (Elon Musk twins) झाला होता, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे एलॉन मस्क यांनी कित्येक वेळा जगाची लोकसंख्या कमी होत असल्याची चिंता उघडपणे व्यक्ती केली आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोण आहेत शिवॉन? शिवॉन झिलिस या न्यूरालिंक (Neuralink) येथे ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्सच्या डिरेक्टर आहेत. ही कंपनी इलॉन मस्क यांनी सुरू केली होती, आणि मस्क आता तेथील चेअरमन आहेत. मे 2017 साली शिवॉन (Who is Shivon Zilis) यांनी ही कंपनी जॉईन केली. याच महिन्यात त्यांची टेस्लामधील आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विभागात (Tesla AI) प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी त्यांनी 2019 पर्यंत काम केलं. यासोबतच त्या ओपन एआय (Open AI) या आर्टिफिशिअल इंटिलिजन्स रिसर्च फर्मच्या बोर्ड मेंबरही आहेत. ही फर्मदेखील एलॉन मस्क यांनीच सुरू केली होती. शिवॉन यांच्या लिंक्ड-इन प्रोफाईलवर ही माहिती आहे. शिवॉन यांचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. त्यांनी येल विद्यापीठातून इकॉनॉमिक्स आणि फिलॉसॉफी या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आहे. या पूर्वी त्यांनी आयबीएम आणि ब्लूमबर्ग बीटा या संस्थांमध्ये काम केलं आहे. एलॉन मस्क यांचं ट्विटर खरेदी करण्याचं डील (Elon Musk twitter deal) जर यशस्वी झालं, तर ट्विटरच्या सीईओ पदावर निवड होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या यादीत शिवॉन यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा, सेक्स स्कँडलमुळे सोडावं लागलं पद कसं झालं उघड? या वर्षी एप्रिल महिन्यात एलॉन आणि झिलिस यांनी कोर्टात एक याचिका दाखल (Elon Musk twins) केली होती. यामध्ये त्यांच्या जुळ्या मुलांना एलॉन मस्कचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. या मुलांचे मधले नाव हे झिलिसचे आडनाव असावे, आणि आडनाव हे मस्क (Elon Musk petition to change his twins’ name) असावे, असं या याचिकेत म्हटलं होतं. मे महिन्यात कोर्टाकडून ही मागणी मान्य करण्यात आली. वेस्टलॉ लीगल रिसर्चमधील एका कोर्ट डॉकेट समरीमध्ये ही बाब दिसून आली. 25 एप्रिल रोजी मस्क आणि झिलिस यांनी ही याचिका दाखल केली होती. 11 मे रोजी एका न्यायाधीशाने ‘एकाहून अधिक मुलांची नावे बदलण्याची ऑर्डर’ असलेल्या या याचिकेला मान्यता देत त्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान, एलॉन यांच्या 18 वर्षांच्या मुलीने (Elon Musk daughter) काही दिवसांपूर्वीच कोर्टात नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली आहे. तिला एलॉन मस्कपासून असलेली ओळख नको असल्यामुळे, ते नाव बदलण्याची मागणी तिने केली आहे. तिने 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर लिंग परिवर्तन करून स्वतःची जेंडर ओळख पुरूष न ठेवता स्त्री केली होती.