JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पंतप्रधानांची Live मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचा धक्का, नंतर काय झालं पाहा VIDEO

पंतप्रधानांची Live मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचा धक्का, नंतर काय झालं पाहा VIDEO

मुलाखत सुरू असतानाच कॅमेरा हलायला लागला. जेसिंडा यांच्या मागे असलेल्या काही वस्तू आणि भिंतीवरचे बोर्डही हालायला लागले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन 25 मे: मुलाखत सुरू असताना मध्येच लहान मुल आलं, मांजर आली, कुत्रा आला असे व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. मात्र एखदी मुलाखत सुरू असतानाच भूकंप आला तर? आणि तेही ती मुलाखत जर एखाद्या पंतप्रधानांची सुरू असती तर काय झालं असतं? हे आज घडलंय ते न्यूझिलंडमध्ये. तिथल्या बहुचर्चित पंतप्रधान जेसिंडा अरर्डेन यांची मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचे धक्के जाणवायला लागले. मात्र त्यांनी घाबरून न जाता अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूझिलंडमध्ये कोरोना व्हायरसमुळे घातलेली बंधनं उठवण्याचं काम सुरू आहे. त्याच विषयी त्या एका चॅनलवर सकाळच्या शोमध्ये माहिती देत होत्या. ही मुलाखत सुरू असतानाच कॅमेरा हलायला लागला. जेसिंडा यांच्या मागे असलेल्या काही वस्तू आणि भिंतीवरचे बोर्डही हालायला लागले. नेमकं काय झाले हे लगेच सगळ्यांच्या लक्षात आलं. मुलाखत घेणाऱ्या अँकरने त्यांना मुलाखत थांबवायची आहे का? असा प्रश्न केला. त्यावर पंतप्रधान जेसिंडा नाही म्हणाल्या. मला काहीही अडचण नाही. मी सुरक्षित आहे. मी मोकळ्या जागेत आहेत. माझ्यावर कुठलेही लाईट्स वगैरे काही नाही त्यामुळे मी सुरक्षित असल्याचं त्यांनी हसत सांगितलं आणि मुलाखत पूर्ण केली. हे वाचा -  संसर्गाच्या 11 दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही नंतर जेव्हा माहिती आली तेव्हा तो भूकंपाचा धक्का हा 5.8 रिश्टर स्केलचा होता अशी माहिती बाहेर आली. त्यामुळे कुठलीही जिवित किंवा वित्त हानी झाली नाही. न्यूझिलंड हा भूकंपप्रवण देश समजला जातो. तिथे दरवर्षी तब्बल 20,000 धक्के जाणवतात. दररोज सरासरी 50 ते 80 सौम्य आणि हलक्या स्वरुपाचे धक्के जाणवतात अशी माहिती दिली जाते.

त्यामुळे सगळयांना आता त्याची सवय झाली आहे. मात्र हे धक्के जेवे मोठे असतात तेव्हा ते जाणवतात. अशा वेळी काय करायचं याचं प्रशिक्षण इथल्या लोकांना दिलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या