काबूल, 22 जून: अफगानिस्तान भूकंपाच्या (Earthquake in Afghanistan) तीव्र झटक्यांना हादरला आहे. बुधवारी (22 जून) झालेल्या भूकंप 6.1 रिश्टर स्केलचा असल्याचं समोर आलं आहे. भूकंपात मोठं आर्थिक आणि जीवितहानी झाल्याचंही समोर आलं आहे. अफगानिस्थानातील स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, भूकंपामुळे देशात किमान 250लोकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जियोलॉजीकल सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून सुमारे 44 किमी अंतरावर होता आणि तो 51 किमी खोलीवर होता. हा भूकंप इतका जोरदार होता की शेजारील पाकिस्तानातील लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले पाकिस्तानातही 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सध्या तरी जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. जिओ न्यूजनुसार, बुधवारी पहाटे पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाच्या काही भागात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. इस्लामाबाद, मुल्तान, भाकर, फालिया, पेशावर, मलाकंद, स्वात, मियांवली, पाकपट्टन आणि बुनेरसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. मलेशियामध्ये हादरे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मलेशियाच्या काही भागात 5.1 रिश्टर स्केलचा भूकंपही झाला. राजधानी क्वालालंपूरपासून 561 किमी पश्चिमेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता.