JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / आधी वीज कापली...स्फोट केला आणि...64 जणांनी आखला इराणच्या अणू शास्त्रज्ञांच्या हत्येचा कट

आधी वीज कापली...स्फोट केला आणि...64 जणांनी आखला इराणच्या अणू शास्त्रज्ञांच्या हत्येचा कट

फखरीजादेह इराणमधील महत्त्वाचे व्यक्ती होते, त्यांना देशाच्या अणु कार्यक्रमाचा जनक म्हटले गेले आहे.

0105

इराणच्या अणूशास्त्रज्ञांच्या हत्येशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. शुक्रवारी इराणचे अणूशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांचा मृत्यू झाला. इराणने इस्रायलवर खुनाचा आरोप केला असून या घटनेनंतर बराच काळ इस्रायलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वेळी, 62 जणांनी एकत्रितपणे फखरीजादेह यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
0205

डेली मेलच्या वृत्तानुसार, इराणी पत्रकार मोहम्मद अहवाजे यांनी लीक झालेल्या कागदपत्रांच्या आधारावार दावा केला आहे की, इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्य रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन ऑर्गनायजेशनचे प्रमुख फखरीजादेह यांची हत्या करण्यासाठी तेहरानच्या महामार्गावरील एका चौकात 12 लोक आधीच पोहोचले होते. तर इतर 50 जण ठिकठिकाणी मारेकऱ्यांची मदत करीत होते.

जाहिरात
0305

इराणच्या पत्रकाराचे म्हणणे आहे की, हल्लेखोरांनी हल्ले करण्यासाठी परदेशात विशेष प्रशिक्षण घेतले होते आणि परदेशी सुरक्षा आणि गुप्तहेर सेवांशी संबंधित होते. हल्लेखोरांनी दोन कार व चार मोटारसायकली वापरल्या. घटनेच्या काही काळाआधीच या भागातील वीजही कापली गेली होती.

जाहिरात
0405

फखरीजादेह यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी चौकाजवळ पोहोचताच तिथे आधीपासून असलेल्या वाहनात स्फोट झाला. इराणचे पत्रकार मोहम्मद अहवाजे यांचे म्हणणे आहे की, इराणकडून आलेल्या लीक कागदपत्रांवरून असे दिसून आले की फखरीजादेह यांनाही कारमधून बाहेर काढले गेले आणि त्यांच्यावर गोळी चालवण्यात आली.

जाहिरात
0505

घटनेनंतर सर्व हल्लेखोर तेथून गायब झाले. अहवालानुसार, खून झालेल्या 12 लोकांपैकी कोणीही जखमी झाले नाही आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. फखरीजादेह इराणमधील महत्त्वाचे व्यक्ती होतेय त्यांना देशाच्या अणु कार्यक्रमाचा जनक म्हटले गेले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या