JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अखेर अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी कसली कंबर

अखेर अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी कसली कंबर

आतापर्यंत अमेरिकेत 32 हजारहून अधिक लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 56 हजारहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 17 एप्रिल : अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसनं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक अमेरिकेत आहे. आतापर्यंत अमेरिकेत 32 हजारहून अधिक लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 56 हजारहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेला कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. जगभरात अमेरिका इटली, स्पेन, फ्रान्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे. दरम्यान या काळात अमेरिकेत जीवितहानीसोबतच व्यवहार आणि व्यवसाय ठप्प असल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरीही या लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर काय नियम पाळायचे या संदर्भात ट्रम्प यांनी आज जनतेला संबोधित केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन टप्पे सांगितले आहेत. या तीन फेजेसचं पालन करणं आवश्यक आहे. प्रत्येक राज्यासाठी फेजनुसार नियमावली असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन उठवण्यासाठी तीन फेजमध्ये योजना तयार करण्यात आली आहे. ज्या राज्यातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असेल त्यांचा लॉकडाऊन हटवण्याचा विचार करण्यात येईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

पहिल्या टप्प्यात (first phase )मध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन कऱणं आवश्यक आहे. त्यामध्येही 10 पेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंगमध्ये असू नयेत. ज्यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी आपल्या घरी सुरक्षित राहावं. विनाकारण घराबाहेर पडू नये अथवा प्रवास करणं टाळावं. तिसऱ्या टप्प्यात गर्दी न करता अशा ठिकाणांवर एकमेकांसोबत संपर्क आल्यास त्यातील वेळ कमी ठेवाव. कामाव्यतिरिक्त वेळ घालवत गर्दीच्या ठिकाणी थांबू नये. बार, जिम, किंवा मोठ्या स्थानकांवर कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठे बदल करावे लागतील. कोरोनाचा वेगानं वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी या त्रिसूत्री योजनेचा आवलंब करण्याची शिफारस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही अशा राज्यांमधील लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय ट्रम्प घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या