JOIN US
मराठी बातम्या / विदेश / COVID-19च्या औषध परिक्षणासाठी उंदरांची कमतरता, शास्त्रज्ञांनी शोधला हा उपाय

COVID-19च्या औषध परिक्षणासाठी उंदरांची कमतरता, शास्त्रज्ञांनी शोधला हा उपाय

ज्या उंदिरांमध्ये माणसांसारखी इम्यून सिस्टिम असणं आवश्यक असतं. पांढऱ्या उंदिरांमध्ये ती होत असते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क 13 जून: कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत. अनेक कंपन्यांनी औषध शोधल्याचा दावाही केलाय. त्यांचे प्राण्यांवर आणि माणसांवरही प्रयोग सुरू आहेत. मात्र अधिकृतपणे कुठलंही औषध प्रमाणित झालं नाही. शोध प्रक्रियेत आघाडीवर असलेल्या या औषधांचा सुरुवातीला उंदरांवर प्रयोग केला जातो. त्यासाठी खास प्रकारच्या पांढऱ्या उंदिरांची गरज असते. मात्र शास्त्रज्ञांना या उंदरांची कमतरता भासत आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी खास उपायही शोधून काढला आहे. ज्या उंदिरांमध्ये माणसांसारखी इम्यून सिस्टिम असणं आवश्यक असतं. पांढऱ्या उंदिरांमध्ये ती होत असते. मात्र अशा प्रकारचे प्राणी मिळत नसल्याने शास्त्रांनी खास प्रकारचे व्हायरस काही उंदिरांमध्ये सोडून अशा प्रकारची सिस्टिम तयार केली आहे. आता या उंदिरांवर औषधांचे प्रयोग करण्यात येणार आहे. दरम्यान,  औषधं उत्पादन क्षेत्रातली दिग्गज अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केलाय. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोजेस तयार करणार आहे. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार असून त्यासाठी 1,045 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात 18 ते 65 या वयोगटातली माणसं निवडण्यात आली आहेत. जगभरात सध्या 10 कंपन्यांनी औषध शोधण्यात प्रगती केल्याचा दावा केला आहे. औषध शोधून त्याच्या मानवी चाचण्या सुरू केल्यानंतरही नियमित प्रक्रियेनुसार त्या औषधाचा शरिरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. यात आता सुट दिली जाणार आहे. सुरुवातीच्या अभ्यासानंतर त्यात यश मिळालं आणि त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाहीत तर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या