JOIN US
मराठी बातम्या / विदेश / दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना ठरतोय घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना ठरतोय घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

महासत्ता असलेल्या अमेरिकेत तर सध्या परिस्थिती भीषण आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 713 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 01 एप्रिल : कोरोनामुळं संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेत तर सध्या परिस्थिती भीषण आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 713 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 3,896 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हे 9/11च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झाले होते, परंतु कोरोनाने हा आकडा मागे ठेवला आहे. सरकारी नोंदीनुसार 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2977 लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसात 865 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा दिवसेंदिवस वाढता असल्यामुळं सध्या अमेरिकेत चिंतेचे वातावरण आहे. सध्या अमेरिकेत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र कोणालाही क्वारंटाइन करण्यात आलेले नाही. राष्ट्राध्यत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला क्वारंटाइन करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते, त्यानंतर तब्बल 20 हजार लोकांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात सर्वात जास्त कोरोनारुग्ण आहेत. न्यूयॉर्कला कोरोनाचे नवे केंद्र म्हणूनही संबोधले जात आहे. 9/11 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर आत्मघातकी हल्ल्यांची मालिका होती. याच दिवशी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सला चार प्रवासी विमानांनी टक्कर दिली होती. तर, दोन विमाने कोसळली होती. त्यामधील सर्व लोक आणि इमारतींमध्ये काम करणारे बरेच लोक ठार झाले होते. दोन्ही मोठ्या इमारती २ तासाच्या आत कोसळल्या, जवळील इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आणि अन्य इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. डेली मेल यूएसच्या वृत्तानुसार या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. मृतांचा आकडा जाणार 82 हजारवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या दिग्गज डॉक्टरांचा समावेश असलेला एक COVIDE 19 टास्क फोर्स तयार केला आहे. त्यांच्या सल्ल्यानेच ट्रम्प हे निर्णय घेत असल्याचं सांगितलं जातं. तर अमेरिकेतले विविध थिंक टँक्स आणि विद्यीठही याचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासाची विविध आकडेवारी समोर आली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 15 एप्रिलपासून दररोज 2 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यताही व्यक्त केली गेली आहे. अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. न्यूयॉर्कमधली सर्व हॉस्पिटल्स पेशंट्सनी खच्चून भरली असून डॉक्टर्संना साधनसामुग्रीही पुरेश्या प्रमाणात मिळत नसल्याची बाबा समोर आली आहे. तर अर्थव्यवस्थेलाही जबर धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या