JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाचं नवं केंद्र आहे 'हे' शहर, दर 3 मिनिटाला होतोय एकाचा मृत्यू

कोरोनाचं नवं केंद्र आहे 'हे' शहर, दर 3 मिनिटाला होतोय एकाचा मृत्यू

इटलीमधील कोरोनाव्हायरसमुळे 24 तासात 739 लोकांचा मृत्यू झाला असून, एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लोंबार्दिया, 22 मार्च : चीनच्या वुहान शहारातून आलेला कोरोनाव्हायरस झपाट्याने जगभर परसला. इटलीमध्ये तर या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे इटलीत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी इटलीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 24 तासात 793 लोकांचा मृत्यू झाला असून, एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. याचबरोबर इटलीमधी मृतांचा आकडा हा 4825 झाला आहे. चीनच्या वुहानमध्ये ज्या प्रमाणे हा विषाणू वाऱ्यासारखा पसरला तशीच परिस्थिती इटलीतील लोंबार्दिया येथे झाली आहे. इटलीमधील या शहरात 24 तासांत 546 म्हणजे दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. त्यामुळं लोंबार्दिया शहरातील परिस्थिती भयंकर आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या मृत्यू दरातही वाढ होत आहे. जगभरात या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ 38.3 टक्के लोक इटलीमध्ये आहेत. चीनपेक्षा इटलीची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. येथे, कोविड -19पासून संक्रमित लोकांची संख्या 53 हजार 578 झाली आहे. वाचा- कोरोनाला कसा हरवणार भारत? रुग्णालयात 84 हजार लोकांसाठी एक बेड तर… मिलानमध्ये 3हजारहून अधिक लोकांचा मृत्यू मिलानजवळील नॉर्थ लोंबार्दियामध्ये मृतांची संख्या वाढून तीन हजारांहून अधिक झाली आहे. इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी हे दोन तृतीयांश आहे. इटलीमध्ये, शुक्रवारपासून 1420 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारच्या सर्व उपायांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. वाचा- JantaCurfew : आज ही 5 कामं केली नाही तरच मोडेल कोरोनाची कंबर! फ्रान्समध्ये मृतांचा आकडा 562 फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 562 पर्यंत पोहोचला आहे. या विषाणूमुळे 6172 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. रुग्णालयात 1525 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. वाचा- JantaCurfew : आज ही 5 कामं केली नाही तरच मोडेल कोरोनाची कंबर! WHOने दिला इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस यांनी, जगभरात 2 लाख 10 हजाराहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. आजारपणामुळे 11हजारहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. दिवसेंदिवस या आजाराची तीव्रता वाढत आहे, असे सांगितले. दरम्यान, या आजारामुळे बहुतेक ज्येष्ठांना बळी पडले आहेत परंतु तरुणदेखील त्यापासून अलिप्त नाहीत. आकडेवारी सांगते की बर्‍याच देशांमध्ये, 50 वर्षांखालील लोकांना संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या