बिल गेट्स- मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक यांचा पटकन मिळणाऱ्या यशावर विश्वास नाही. ते नेहमी त्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात जिथे मोठ्या काळासाठी यश मिळेल आणि टिकेल. तसेच समाजासाठी दानधर्म करायलाही त्यांना आवडते. या कृतीतून त्यांना ताकद मिळते असे त्यांना अनेक मुलाखतीत सांगितले आहे.
वॉशिंग्टन, 7 एप्रिल : जगभरात वेगाने पसरणार्या कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शास्त्रज्ञ लस तयार करण्यात गुंतले आहेत. अमेरिकेच्या (America) एका कंपनीने मार्च महिन्याच्या मध्यात कोरोना (Covid - 19) लसीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र आता दुसर्या पेनसिल्व्हेनिया बायोटेक कंपनीनेही कोरोना लसीची चाचणी सुरू केली आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या या लसीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशाननाने मंजूरी दिली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकेतील न्युयॉर्क शहराला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. येथे मृत्यूचा आकडा मोठा आहे. संबंधित - एक कोरोना रुग्ण 30 दिवसांत करू शकतो 406 जणांना लागण, सरकारने दिला धोक्याचा इशारा संशोधकांच्या मते सोमवारी ही लस माणसांना देण्यात आली आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सच्यावतीने विकसित केलेली ही लस तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि एपिडेमिक प्रिपेडेन्स इनोव्हेशनतर्फे निधी देण्यात आला आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सनी तयार केलेल्या आयएनओ-4800 या लसची सोमवारपासून मनुष्यांवर तपासणी केली जात आहे. मनुष्यावर कोरोना लस चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आलेली ही अमेरिकेतील दुसरी कंपनी आहे. यापूर्वी, मॅसेच्युसेट्स बायोटेक मॉडर्नने मार्चच्या मध्यात मनुष्याची चाचणी सुरू केली होती. संबंधित - 7 दिवसांपासून गाडीत केलंय घर, कुटुंबाला संसर्गापासून रोखणाऱ्या डॉक्टरला सलाम अचूक चाचणीच्या निकालासाठी लागेल एक वर्षाचा अवधी अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. एन्थनी एस. फॉसी यांनी आधीच सांगितले आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेली लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागेल. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सने लसीची तपासणी करण्यासाठी 40 निरोगी व्यक्तींची निवड केली आहे. या व्यक्तींना लसीचे दोन डोस चार आठवडे दिले जातील. लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असे कंपनीने म्हटले आहे संपादन - मीनल गांगुर्डे