JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोंबड्यांच्या झुंजीत हिंसाचार; गँगवॉरमध्ये गोळीबार, तब्बल 20 जणांचा मृत्यू

कोंबड्यांच्या झुंजीत हिंसाचार; गँगवॉरमध्ये गोळीबार, तब्बल 20 जणांचा मृत्यू

स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मार्च : मेक्सिकोच्या (Mexico News) मिचोआकानमध्ये जिनापेकुआरो नगर पालिकेच रविवारी रात्री एका गुप्त कॉकफाइट शो दरम्यान सशस्त्र हल्ल्यात कमीत कमी 20 लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. वृत्तसंस्था सिन्हुओच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या अटॉर्नी जनरलच्या कार्यालयाने एका वक्तव्यात सांगितलं की, या हत्या रविवारी रात्री लास तिनाजस शहरात झाल्या. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाठवण्यात आलं. ज्यात 19 जणांना गोळ्या (16 पुरुष आणि 3 महिला) लागल्याने मृत्यू झाला. तर 32 वर्षीय एका व्यक्तीचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. याशिवाय अन्य जखमींना जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. अटॉर्नी जनरलच्या कार्यालयानुसार, अद्याप तपास सुरू आहे. मिचोआकन राज्यात साधारण 10 वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या गुन्हेगारी गटांकडून शहरात हिंसाचार घडवून आणला जात आहे. मेक्सिकोच्या सार्वजनिक सुरक्षा सचिवालयानुसार, 2021 मध्ये मेक्सिकोमध्ये नोंदवलेल्या सुमारे 70 टक्के खून संघटित गुन्हेगारीशी संबंधित होते. घटनास्थळावरून पोलिसांना हजारो रिकाम्या गोळ्या सापडल्या. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, एका गटाकडून दुसऱ्या गटाचा हा नरसंहार आहे. हे ही वाचा- सातव्या मजल्याच्या बाल्कनीत रांगेत उभं राहून अख्ख्या कुटुंबाने मारली उडी, हादरवणारी घटना मेक्सिकोमध्ये कोंबड्यांची झुंज अवैध असतानाही अत्यंत लोकप्रिय आहे. लपूनछपून होणारी झुंड पाहण्यासाठी हजारो लोक एकत्र येतात. हा भाग अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीसाठी युद्धाचं मैदान झालं आहे. शक्तीशाली जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलला अनेक लहान लहान टोळ्या कोकिनच्या व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी आव्हान देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या