JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / तायवानवर हल्ल्याच्या तयारीत चीन; 'परिणाम गंभीर होतील', अमेरिकेचा इशारा

तायवानवर हल्ल्याच्या तयारीत चीन; 'परिणाम गंभीर होतील', अमेरिकेचा इशारा

गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील दुरावा दिवसेंदिवस वाढत आहेत

0105

अमेरिका आणि चीन (America And China) दरम्यान अद्यापही तणाव सुरू आहे. तायवानच्या सीमेवर चिनी सैनिकांच्या जहाजांची संख्या वाढत आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या एअरक्राफ्ट कैरियर यूएसएस रोनाल्ड रीगन पुन्हा साऊथ चायानाच्या समुद्रात तैनात केला आहे.

जाहिरात
0205

अमेरिकेच्या या युद्धपोतने चीनच्या जवळील एक द्वीपजवळ युद्धाभ्यासही केला. यूएस नेवी (US Navy) चा एअरक्राफ्ट कॅरियर जगभरात अमेरिकेच्या नौसैनिकाच्या मजबुतीचं प्रतीक मानलं जातं. अमेरिकेने साऊथ चायना समुद्रात हा युद्धाभ्यास अशा वेळी सुरू केला आहे, जेव्हा या भागात चीनच्या नौसेनाही युद्धाभ्यास करीत आहे.

जाहिरात
0305

यूएसएस रोनाल्ड रीगनचे एअर ऑपरेशन ऑफिसर जोशुआ फगनने सांगितले की साऊथ चायनाच्या समुद्रात या युद्धाभ्‍यासाचा हेतू या भागातील प्रत्येक देशावर उड्डाण करणे, समुद्री भागातून जाणे आणि आतंरराष्ट्रीय कायद्यानुसार संचालन करण्यात मदत करण्याचे आहे.

जाहिरात
0405

या भागात चीनचा जपान, इंडोनेशिया, तायवान, ब्रुनेई आणि फिलीपींस सह अनेक देशांसोबत विवाद आहे.

जाहिरात
0505

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी हैनान द्वीप वर मोठ्या संख्येने प्रशिक्षण अभ्यास करण्याची योजना तयार करीत आहे. जपानच्या मीडियानुसार या दरम्यान चिनी सैन्य तायवान नियंत्रित द्वीपावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू शकते. यानंतर अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. याचा परिणाम वाईट होऊ शकतो असं इशारा अमेरिकेने दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या