JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / PHOTOS : धक्कादायक! चीनने मिसाईल डागण्यासाठी खोदले शेकडो खड्डे, सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल

PHOTOS : धक्कादायक! चीनने मिसाईल डागण्यासाठी खोदले शेकडो खड्डे, सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल

चीननं सॅटेलाईन ठेवण्यासाठी हजारो खड्डे खोदल्याची बाब सॅटेलाईन इमेजेसवरून समोर आली आहे. या खड्ड्यांमध्ये मिसाईल लपवून ठेवण्यात येतात. जेव्हा गरज पडेल, तेव्हा या खड्ड्यांवरील झाकण काढून ते लगेच फायर करण्याची तयारी करण्यात येते.

0105

चीननं सॅटेलाईन लपवून ठेवण्यासाठी असे खड्डे खोदले आहेत. या खड्ड्यांमध्ये अद्याप मिसाईल ठेवण्यात आले आहेत की नाही, हे या फोटोतून स्पष्ट होत नाही. पण अमेरिकेपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे मिसाईल्स चीनकडं आहेत.

जाहिरात
0205

चीनच्या वायव्य भागात असणाऱ्या यूमेन शहरापाशी एक भलंमोठं वाळवंट आहे. या वाळवंटात हे खड्डे खोदण्यात आले आहेत. फोटो पाहून हे काम अत्यंत वेगानं सुरू असल्याची कल्पना येते, अमेरिकेनं म्हटलं आहे.

जाहिरात
0305

जानेवारी महिन्यात या परिसरात काहीही विकसित झालं नव्हतं. इथे एकही खड्डा नव्हता आणि किंवा वाहनांची वर्दळही नव्हती. मात्र गेल्या 7 महिन्यात वेगाने घडामोडी घडत असून या भागात खड्डे खणले गेल्याचं या फोटोतून स्पष्ट होत आहे.

जाहिरात
0405

चीनकडे असणारं ICBM मिसाईल हे मोठाल्या ट्रकवर लावलं जातं आणि हे ट्रक बोगद्यांमध्ये लपवून ठेवण्यात येतात. मात्र आता ट्रकांऐवजी खड्ड्यांमध्येदेखील हे मिसाईल लपवून ठेवण्याची तयारी चीननं सुरू केल्याचं दिसत आहे.

जाहिरात
0505

चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची क्षमता 15 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे. या टप्प्यात अमेरिकेतील अनेक शहरं येतात. अमेरिका आणि रशियाप्रमाणं चीन आपली आण्विक क्षमता वाढवत नसला तरी हल्ला झालाच, तर प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या