बिजिंग, 31 जानेवारी: जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Most Populous) असणारा चीन (China) सध्या घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे (Population) चिंताग्रस्त आहे. आतापर्यंत नागरिकांवर एकच मूल जन्माला घालण्याचं बंधन होतं. मात्र आता हे बंधन काढून टाकण्यात आलं असलं तरी लोकसंख्या वाढत नसल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळेच आता लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक ऑफर दिल्या जाऊ लागल्या आहेत.