JOIN US
मराठी बातम्या / विदेश / सलग 6वेळा राष्ट्रपतीपदी निवड होत रचला इतिहास मात्र, विजयाच्या दुसऱ्याच दिवशी बंडखोरांनी केली हत्या

सलग 6वेळा राष्ट्रपतीपदी निवड होत रचला इतिहास मात्र, विजयाच्या दुसऱ्याच दिवशी बंडखोरांनी केली हत्या

Idriss Deby यांची सलग सहाव्यांदा चाड देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिल: दक्षिण आफ्रिकेतील चाड या देशाचे राष्ट्रपती इद्रिस डेबी यांचे निधन (Chad President Idriss Deby died) झाल्याचं वृत्त समोर येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या संदर्भात वृत्त दिल्यानंतर चाडच्या सैन्याने याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तरेकडील बंडखोरांविरुद्धच्या युद्धात सैन्य कमांडिग करताना त्यांना दुखापत झाली होती. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. theafricareport ने इद्रिस डेबी यांच्या निधनाचे वृत्त दिलं आहे. आपल्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं, चाड देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत इद्रिस डेबी यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला होता. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि इद्रिस डेबी यांना 79.3% मते मिळाली होती.

इद्रिस डेबी यांच्या निधानाच्या वृत्तानंतर, चाड देशाची संसत विसर्जित करण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चाडमधील सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इद्रिस डेबी यांचा मुलगा जनरल महामत काका याला देशाचा अंतरिम प्रमुख म्हणून निवडण्यात आले आहे. 1990 मध्ये एका विद्रोहानंतर सत्तेत आलेल्या इद्रिस डेबी यांच्या मृत्यूच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. आहे. मृत्यूच्या एक दिवसआधी म्हणजेच सोमवारी त्यांची राष्ट्रपतीपदावर सहाव्यांदा निवड झाल्याची घोषणा झाली होती.

इद्रिस डेबी यांनी राष्ट्रपतीपदावर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करणारे भाषण देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी चाडियन येथील सैन्य दलाला भेट देण्याचं ठरवले अशी माहिती त्यांचे सहकारी महामत झेन बडा (Mahamat Sen Bada) यांनी दिली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाडमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत इद्रिस डेबी यांना 79.32 टक्के मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी अल्बर्ट यांना 10.32 टक्के आणि महिला उमेदवार असलेल्या लीडी बीससेम्डा यांना अवघे 3.16 टक्के मते मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या