लंडन, 14 जानेवारी: ज्या रात्री ब्रिटनची राणी (British Queen) तिच्या वृद्ध पतीला (Husband) अखेरचा निरोप देत (Mourn) होती, त्याच रात्री पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) आणि त्यांचे अधिकारी दारू पार्टीत रमले (Liquor Party) असल्याची बाब उघड झालीय. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या दारु पार्टी प्रकरणानं ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठा वादंग उभा राहिला असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आता पंतप्रधान जॉन्सन यांच्या आणखी दोन पार्ट्या चव्हाट्यावर आल्या असून ब्रिटनची राणीच्या पतीला अखेरचा निरोप देत असताना पंतप्रधान मात्र पार्टीत रमल्याची बाब पुढं आली आहे. त्यामुळे या विषयाला आणखी भावनिक किनार आली आहे. ब्रिटनची राणी देत होती अखेरचा निरोप ब्रिटनमधील पहिल्या लॉकडाऊनच्या काळात भरवण्यात आलेली ‘TTMM पार्टी’ प्रकरण गाजल्यानंतर ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आणखी दोन दारु पार्ट्यांची बातमी ‘द टेलिग्राफ’नं समोर आणली आहे. ही पार्टी झाली 16 एप्रिल 2021 या दिवशी. या काळातही ब्रिटनमध्ये लॉकडाऊन होता आणि सोशल गॅदरिंग आणि पार्ट्यांवर बंदी होती. दुसऱ्याच दिवशी ब्रिटनच्या राणीचे पती फिलिप यांना अखेरचा निरोप दिला जाणार होता. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं. या कार्यक्रमात ब्रिटनची राणी 73 वर्षं एकत्र संसार केलेल्या आपल्या पतीला अखेरचा निरोप देत होती,तर ब्रिटीश पंतप्रधान आणि त्यांचे अधिकारी मात्र दारु जमवून पार्टी करण्यात गुंग होते, अशी माहिती समोर आली आहे. हे वाचा -
स्वपक्षीयांकडून राजीानाम्याची मागणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या या बेजबाबदार वर्तनासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांसोबत आता त्यांच्या पक्षातील नेतेही करू लागले आहेत. एका पार्टीबाबत माफी मागणारे पंतप्रधान जॉन्सन आता या आणखी दोन पार्ट्यांबाबत काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.