JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ब्रिटीश नरमले, भारतीयांसाठी क्वारंटाईनची अट आजपासून मागे; वाचा नवे नियम

ब्रिटीश नरमले, भारतीयांसाठी क्वारंटाईनची अट आजपासून मागे; वाचा नवे नियम

भारतीयांना ब्रिटनमध्ये येण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये (Britain changes entry rules for Indians) सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 11 ऑक्टोबर : भारतीयांना ब्रिटनमध्ये येण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये (Britain changes entry rules for Indians) सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी भारतीयांना लावण्यात आलेल्या कडक नियमांमध्ये सवलत देण्यात आली असून क्वारंटाईनची (Condition of  quarantine removed for Indians) अट काढून टाकण्यात आली आहे. भारतानं दाखवलेल्या आक्रमक (Britain softens the rules) भूमिकेनंतर ब्रिटननं भारतीयांसाठीचे नियम शिथिल केले आहेत. काय आहे नवे नियम नव्या नियमांनुसार जर एखाद्या भारतीय नागरिकाने कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर त्याला क्वारंटाईन होण्याची गरज असणार नाही. यापूर्वी लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनादेखील क्वारंटाईन राहण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आता ती काढून टाकण्यात आली आहे. भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त एलेक्स एलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबरपासून भारतीयांवर ब्रिटन प्रवेशासाठी घातलेले नियम काढून टाकण्यात आले आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्ड किंवा ब्रिटनने मान्यता दिलेली इतर कुठलीही लस घेतली असेल, त्यांना थेट ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भारत सरकारनं केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. भारत ‘रेड लिस्ट’मधून बाहेर ब्रिटननं भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये केला होता. या देशातील नागरिक जर ब्रिटनमध्ये आले, तर विमानतळावरून त्यांना थेट क्वारंटाईन व्हावं लागणार होतं. या देशांतील नागरिकांचं कोरोना लसीकरण झालं असेल, तरीही त्यांना क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र आता भारतासह एकूण 37 देशांना या यादीतून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे या यादीत आता केवळ 7 देश उरले आहेत. भारताच्या दणक्यानंतर जाग भारतीय प्रवाशांना ब्रिटन प्रवेशासाठी कडक नियम लागू केल्यानंतर भारतानेही ब्रिटनच्या नागरिकांसाठी तसेच कडक नियम लागू केले होते. त्यानंतर ब्रिटन सरकार नरमलं आणि भारताला रेड यादीतून बाहेर काढण्याच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झाली. ही प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून आता लसीकरण झालेल्या भारतीयांना क्वारंटाईन राहण्याची गरज पडणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या