मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शेवट झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यानंतर जॉन्सन यांची प्रतिमा खराब झाली होती. महिनाभरापूर्वी झालेल्या अविश्वासदर्शक ठरावाच्या प्रस्तावात त्यांनी खुर्ची वाचवली. पण, गेल्या 48 तासांमध्ये 50 पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं त्यांना पद सोडावं लागलं. आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid) आणि भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जॉन्सन सरकारला गळती लागली. बुधवारी अर्थ सेवा मंत्री जॉन ग्लेन, सुरक्षा मंत्री रिचेल मॅक्लिएन, निर्यात आणि समानता मंत्री माईक फ्रीअर यांच्यासह 50 मंत्र्यांनी जॉन्सन सरकारवर अविश्वास व्यक्त केला होता. पार्टीगेट प्रकरणात गेल्याच महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी विश्वादर्शक प्रस्ताव जिंकला आहे. आता उदरामतवादी पक्षाच्या नियानुसार 12 महिने त्यांच्यावर दुसरा अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नव्हता. मात्र ही मुदत कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा त्यांच्याच पक्षाच्या खासदारांचा प्रयत्न होता. स्वत:च्याच पक्षाच्या खासदारांचा विश्वास गमावल्यानं जॉन्सन यांना पद सोडावे लागले आहे.
जॉन्सन यांनी सुरूवातीला राजीनामा देण्याची ताठर भूमिका घेतली होती. पण, मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरूच राहिल्यानं त्यांना अखेर पद सोडावं लागलं आहे.