नवी दिल्ली, 30 जून: ब्राझील (Brazil) सरकारनं लससाठी भारत बायोटेकशी (Suspends Covaxin Contract) केलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्राझीलबरोबर 32.4 कोटी डॉलर केलेल्या लसीच्या (Covid-19 Vaccine) करारामुळे भारत बायोटेकला (Bharat Biotech) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जैअर बोलसोनारो (President Jair Bolsonaro) यांच्याविरोधात अनियमिततेच्या आरोपानंतर देशाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आरोग्यमंत्री (health minister) मार्सेलो किरोगा यांनी ही माहिती दिली. बोलसनोरो यांनी कोणत्याही प्रकारची अनियमितता नाकारली आहे. ब्राझीलमध्ये या करारावर बरेच प्रश्न उपस्थित होत होते, त्यानंतर आता 32 कोटी डॉलर्सचा हा करार रद्द करण्यात आला आहे. या करारानुसार ब्राझील भारत बायोटेककडून एकूण 20 कोटी लसीचे डोस खरेदी करणार होता. मात्र ब्राझीलमध्ये या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि राष्ट्राध्यक्ष जैअर बोलसोनारो यांच्यावर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे. हेही वाचा- अदार पूनावाला यांच्याविरोधात न्यायालयात अर्ज दाखल, 2 जुलैला सुनावणी ब्राझीली मीडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लसींसाठी केलेला करार स्थगित राहिल. दरम्यान ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार दावा केला जात आहे की या करारात कोणताही गैरप्रकार करण्यात आलेला नाही. यापूर्वी गुरुवारी सीएनएन ब्राझीलने मंत्रालयाने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सीजीयूच्या प्राथमिक विश्लेषणानुसार करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही, परंतु त्या पाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.