न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मूळचे भारतीय पण परदेशात स्थायिक झालेले प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या हल्लात रुश्दी यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. खूप रक्तस्त्रावही झाला. त्यांच्या प्रकृती संध्या नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. संशयित हल्लेखोराला न्यू जर्सीमधून तब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे एक बॅग आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रश्दी यांच्यावर हल्ला करणारा २४ वर्षांचा तरुण असल्याचं समोर आलं आहे. त्याचं नाव hadi Matar असल्याची माहिती मिळाली आहे. या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. हा हल्ला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथे एका कार्यक्रमात बोलण्यासाठी जेव्हा ते व्यासपीठावर आले तेव्हाच त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. 20 सेकंदात त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले.
खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचा एक डोळा ते गमवू शकतात अशी माहिती नुकतीच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. पुढचे काही तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.