JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 224 कोटींच्या घरात राहून वैतागला, 16 वर्षांपूर्वी सोडलं; आता 30 कोटीत विकलं!

224 कोटींच्या घरात राहून वैतागला, 16 वर्षांपूर्वी सोडलं; आता 30 कोटीत विकलं!

एक व्यक्ती आपल्या सुपरसाइज होम आणि लग्जरी मॅन्शनमध्ये राहता राहता इतका वैतागला की, तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : एक व्यक्ती आपल्या सुपरसाइज होम आणि लग्जरी मॅन्शनमध्ये राहता राहता इतका वैतागला की, तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागला. इतकं की त्याने घरच रिकामी केलं. 26 हजार वर्गफूटमध्ये तयार या घरात सर्व सुविधा होत्या, मात्र या सर्व गोष्टी सोडून तो छोट्याशा घरात राहण्यासाठी निघून गेला. Daily Star च्या वृत्तानुसार, अमेरिका स्थित विशाल घरात एक सिनेमा, एक इनडोर पूल, एक जिम, एक पुस्तकालय आणि भव्य शिड्या आहेत. फोटोंमध्ये पाहू शकता की, घरात सर्व सुविधा होत्या. मोठ्या घरात येत नव्हती मजा.. फेसबुकवर भव्य घराता एक संक्षिप्त इतिहास देताना ओक्लाहोमातील एका व्यक्तीने दावा केला की, हा 26 हजार वर्ग फूटाचं घर कधी एका अत्यंत श्रीमंत व्यक्तीचं होतं. एकेदिवशी त्याला या मोठ्या घरात मजा येत नव्हती. त्यामुळे त्याने मोठं घर सोडण्याचा निर्णय घेतला. 16 वर्षांपर्यंत रिकामी होतं घर.. यानंतर 2005 मध्ये घर रिकामी केलं आणि त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मालकाने घराची किंमत 224कोटी असल्याचं सांगितलं होतं. इतक्या मोठ्या घराची त्यावेळी विक्री झाली नाही. वादळामुळे घराची भयंकर अवस्था झाली. 16 वर्षे घर रिकामी राहिल्यामुळे शेवटी आता घर 30 कोटी रुपयात खरेदी करण्यात आलं. हे ही वाचा- पाकिस्तानातील हिंदूंच्या ‘त्या’ अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित! 30 कोटींमध्ये विकलं आलिशान घर… घरात सुंदर दुतर्फा शिड्या आहेत. ज्याच्या मध्ये एक सुंदर लिफ्ट आहे. एक 50 फुटांटा लॅप पूल, एक संपूर्ण होम सिनेमा, सोबतच एक जिम. यात एक वाईन रुमदेखील आहे. ज्यात 3700 हून अधिक दारूच्या बाटल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या