JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जो बायडन यांचं India कनेक्शन; मुंबई-नागपूरशी आहे नातं

जो बायडन यांचं India कनेक्शन; मुंबई-नागपूरशी आहे नातं

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचं भारताशी खास नातं आहे. त्यांचे काही नातेवाईक नागपूरमध्ये राहतात असा खुलासा त्यांनीच केला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 नोव्हेंबर: अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या जो बायडन (Joe Biden) यांचं नागपूरशी जवळचं नातं आहे. बायडन यांचे काही नातेवाईक नागपूरला 1873 पासून राहत आहेत. जो बायडन यांनी त्यांच्या नातेवाईकांचा उल्लेख 2013 आणि 2015मध्ये केला होता. 2013मध्ये जो बायडन जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते, तेव्हा भारतात आले असताना त्यांनी आपल्या नातेवाईकांचा उल्लेख केला होता. बायडन म्हणाले, ‘1972 मध्ये मी जेव्हा सीनेटर झालो तेव्हा मला भारतामधील नातेवाईकांचं पत्र मिळालं होतं.’ बायडन यांचे पूर्वज इस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते. त्याच्यापैकी काही जण ब्रिटीशांच्या काळात भारतात आले होते. तेव्हापासून त्यांचे नातेवाईक भारतामध्येच स्थायिक झाले. नागपूरमध्ये स्थायिक असलेल्या लेस्ली बायडन यांनी जो बायडन यांना पत्र लिहीलं होतं. बायडन राष्ट्रपती झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांना पीटीआय संस्थेशी बोलताना दिली. त्याच्याच नातेवाईकांपैकी असलेल्या सोनिया बायडन यांनी सांगितलं, ‘नागपूर, मुंबई न्यूझीलंड आणि अमेरिकेत राहतात.’ 2018मध्ये झालेल्या एका लग्नासाठी विविध देशातले बायडन कुटुंबीय एकत्र जमले होते. मुंबईत 24 जुलै 2013 शेअर मार्केटच्या एका कार्यक्रमासाठी बायडन यांना आमंत्रण होतं. या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, ‘मला माझ्या नागपूरमधील नातेवाईकांकडून पत्र मिळालं होतं. बायडन कुटुंबाचे पूर्वज 18 व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे.’ मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, ‘भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो’ असंही म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या