JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेनं मोडला इटलीचा रेकॉर्ड, कोरोनामुळे आतापर्यंत 19,681 रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेनं मोडला इटलीचा रेकॉर्ड, कोरोनामुळे आतापर्यंत 19,681 रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये 24 तासांमध्ये 1 हजार 920 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 12 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जगभरात लोखो लोक कोरोना व्हायरसवर उपचार घेत आहेत. तर जवळपास 1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेनं इटलीचा रेकॉर्ड तोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. AFP न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार 24 तासांमध्ये 1 हजार 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत आतापर्यंत मृत्यूचा आकडा जवळपास 20 हजारच्या आसपास पोहोचला आहे. त्यापाठोपाठ इटली 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्पेन आणि फ्रान्सचा क्रमांक आहे. अमेरिकेत व्हायरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्यास सुरुवात झाली. चीन पाठोपाठ इटली, स्पेन, अमेरिका अशा अनेक मोठ्या देशांहस 181 देशांना कोरोनाचा विळखा आहे. या देशांमध्ये अक्षरश: कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येनं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शनिवारी 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 10 एप्रिल रात्री उशिरापर्यंत 18 हजार 849 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. इटली, स्पेन, अमेरिकेला सर्वात जास्त कोरोनाचा धोका आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंद असल्यानं आर्थिक नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या