JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई

तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई

संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) अहवालानुसार तालिबानचं 2011 सालातलं वार्षिक उत्पन्न (Yearly income) 300 मिलियन डॉलर होतं. गेल्या काही वर्षात ही कमाई वाढवून 1.5 बिलियन डॉलर झाली आहे. भारतीय चलनात ही रक्कम आहे 1 अब्ज 11 कोटी 32 लाख 55 हजार रुपये. (सर्व फोटो AFP)

0107

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबान युगाला सुरुवात होत आहे. कमी काळातच तालिबाननं पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तालिबानला पैसे कोण पुरवतं, तालिबानची कमाई किती आहे, तालिबानला शस्त्रं कुठून मिळतात, यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न

जाहिरात
0207

संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2011 च्या रिपोर्टनुसार तालिबानचा वार्षिक महसूल 300 मिलियन डॉलर होता. सध्या तालिबानची वार्षिक कमाई भारतीय चलनानुसार 1 अब्ज 11 कोटी 32 लाख 55 हजार रुपये असल्याची माहिती आहे.

जाहिरात
0307

तालिबान अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याची माहिती आहे. ज्या भागात त्यांची सत्ता असते, तिथं ते भरमसाठ कर लावतात. केवळ अंमली पदार्थांच्या तस्करीतून त्यांना 300 मिलियन डॉलर मिळत असल्याचं सांगितलं जातं.

जाहिरात
0407

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाण उद्योगातून तालिबाननं 464 मिलियन डॉलरची कमाई केली. या उत्पन्नामुळे तालिबानला शस्त्रास्त्रं आणि इतर सामुग्रीसाठी पैसा कमी पडत नाही

जाहिरात
0507

तालिबानला मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. अनेक श्रीमंत देश तालिबानला छुपी मदत करत असल्याचं सांगितलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघाकडून अशा देणग्यांना ‘नॉन गव्हर्नमेंटल चॅरिटेबल फाऊंडेशन नेटवर्क’ असं म्हटलं जातं.

जाहिरात
0607

पाकिस्तान आणि इराणकडून तालिबानला पैसा मिळत असल्याचा दावाही केला जातो. मात्र त्यासाठी कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

जाहिरात
0707

वर्ल्ड बँकेच्या आकड्यांनुसार 2018 साली अफगाणिस्तान सरकारने 11 अब्ज डॉलर खर्च केले, ज्यातील 80 टक्के भाग हा परदेशातून आलेला होता. मात्र तालिबान यापेक्षाही अधिक कमाई करत असल्याचं दिसून येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या