JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश, पाहा PHOTOs

अलिशान बेडरूम, शाही भोजन आणि स्विमिंग पूल; दोस्तम यांच्या महालात तालिबानींची ऐश, पाहा PHOTOs

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती (Ex. vice president) आणि वॉरलॉर्ड म्हणून ओखळले जाणारे अब्दुल राशिद दोस्तम (Abdul Rashid Dostam) हे सध्या अफगाणिस्तान सोडून गेले आहेत. काही वर्षं ते वैद्यकीय उपचारांसाठी टर्कीत राहत होते. त्यानंतर अफगाणिस्तानात परत आलेल्या दोस्तम यांनी तालिबानच्या तावडीतून अफगाणिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर तालिबाननं काबुलमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अलिशान हवेलीवर सध्या तालिबानचा ताबा आहे.

019

तालिबानी फायटर्सनी सध्या अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अब्दुल राशिद दोस्तम यांच्या हवेलीवर ताबा मिळवला असून या भव्यदिव्य इमारतीनं तालिबानींना जुन्या अफगाणी प्रशासकांच्या दृष्टीची एक झलकही पाहायला मिळत आहे.

जाहिरात
029

दोस्तम अफगाणिस्तान सोडून गेल्यानंतर आता त्यांच्या हवेलीवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. ते पूर्ण महालात फिरत आहेत. दोस्तम यांच्या बेडवर ते झोपत आहेत.

जाहिरात
039

दोस्तम हे कशाप्रकारे राजेशाही थाटात राहत होते, हे व्हिडिओ तयार करून तालिबानी अफगाणी नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जाहिरात
049

महालातील ऍपल ग्रीन रंगाच्या या कार्पेटवर तालिबानी बसले आहेत. या महागड्या कार्पेटवरील चित्र पाहता एखाद्या भल्यामोठा माशाच्या शरीरावरच ते बसल्याचा भास होतो.

जाहिरात
059

या चित्रातील फायटर हा कारी सलाहुद्दीन अयुबीचा खासगी सुरक्षारक्षक आहे. अयुबी या तालिबानचा सर्वात शक्तिशाली कमांडर मानला जातो.

जाहिरात
069

दोस्तम काही वर्षं टर्कीत राहून उपचार घेत होते. ऑगस्टमध्ये ते अफगाणिस्तानात परत आले होते. मात्र जिवाला धोका असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
079

मार्शल अब्दुल रशीद दोस्तम हे अफगाणिस्तान सरकारमध्ये 29 सप्टेंबर 2014 ते 19 फेब्रुवारी 2020 या काळात अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती होते.

जाहिरात
089

अफगाणिस्तानच्या उत्तर भागात दोस्तम यांनी स्वतःच्या सैन्यांची फळी तयार केली होती. 1990 च्या संघर्षात त्यांनी तालिबानविरोधात लढा दिला होता.

जाहिरात
099

दोस्तम यांनी हजारो तालिबानी फायटर्सना अटक करून त्यांना मृत्युदंड दिल्याचंही सांगितलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या