JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / तालिबानच्या भीतीने लोकप्रिय अफगाणी गायकाने सोडले गाणे, भाजी विकून करतात गुजराण, पाहा PHOTOs

तालिबानच्या भीतीने लोकप्रिय अफगाणी गायकाने सोडले गाणे, भाजी विकून करतात गुजराण, पाहा PHOTOs

अफगाणिस्तानचे लोकप्रिय कलाकार आणि गायक हबीबुल्लाह शाबाब (Habibullah Shabab) यांनी तालिबानच्या भीतीने गाणे न गाण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक कलाकार पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. ते स्वतः मात्र आता भाजी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. गाण्यापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (सर्व फोटो – AFP)

0106

तालिबानमध्ये अफगाणिस्तानची सत्ता आल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या राष्ट्राध्यक्षांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण देश सोडून निघून जाणं पसंत करत आहेत. अनेक कलाकारांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक हबीबुल्लाह शाबाब यांनीदेखील आपलं गाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0206

हबीबुल्लाह म्हणाले की तालिबाननं गाण्यावर आणि संगीतावर पूर्णतः बंदी आणली आहे. त्यामुळे आता गाण्यावर पोट भरणं अशक्य आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी काही ना काही व्यवसाय करावाच लागेल, असं ते म्हणाले.

जाहिरात
0306

हबीबुल्लाह हे हेलमेंडचे आघाडीचे कलाकार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं शिरकाव केल्यानंतर अऩेकजण घरदार सोडून देशाबाहेर गेले आहेत. कलेपेक्षा जिवंत राहणं आणि शांततेनं जीवन जगणं अधिक महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.

जाहिरात
0406

यापूर्वी अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्याना सईदनेदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. ती आता अमेरिकेत आहे. पाकिस्तानचं फंडिंग रोखण्याची मागणी तिने अमेरिकी सरकारकडे केली होती.

जाहिरात
0506

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सहारा करीमी यांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या यावेळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये आहेत.

जाहिरात
0606

अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट असल्याचं सहारा करिमी यांनी म्हटलं आहे. तिथल्या सद्यपरिस्थितीचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं असून भविष्यात हा सर्वांसाठी धडा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या