JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा

अफगाणी सैन्याची मोठी कारवाई, 24 तासांत 300 तालिबानींचा खात्मा

अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यापासून अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. तालिबाननं अफगाण सैन्याच्या ताब्यातील जागा बळकावायला सुरुवात केल्यानंतर आता अफगाणी सैन्याकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच एका कारवाईत अफगाणी सैन्यानं तालिबानच्या 300 फायटर्सनचा खात्मा केला आहे.

0106

अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर इथं गृहयुद्धाची परिस्थिती तयार झाली आहे.

जाहिरात
0206

अफगाणी सैन्यानं गेल्या 24 तासात 300 तालिबांनींचा खात्मा केला आहे. नंगरहार, लगमन, गजनी, पक्तिका, कंधार, जाबुल, हेरात, जोज्जान, समांगन, फरयाब, सर-ए पोल, हेलमंद, निमरूज, कुंदुज, बगलान आणि कपिसा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

जाहिरात
0306

या कारवाईत एकूण 303 तालिबानी मारले गेले आहेत, तर 125 पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात
0406

नुकताच तालिबाननं अफगाणिस्तानचे हंगामी संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांना ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून मोहम्मदी थोडक्यात बचावले.

जाहिरात
0506

सुमारे 5 तास चाललेल्या कारवाईत 4 हल्लेखोरांनाही ठार करण्यात आलं. तर एका बस हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जखमी आहेत.

जाहिरात
0606

अफगाणिस्तानमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत संयुक्त राष्ट्र संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर सत्तेसाठी तालिबान मानवाधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं युएननं म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या