JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ...तर येत्या 21 जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य

...तर येत्या 21 जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य

वादळ, भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन सारख्या आपत्तीही येत आहेत. या सगळ्या संकटात आता माया कॅलेंडरनं केलेल्या दाव्यानुसार येत्या 21 जूनला संपूर्ण जग नष्ट होईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 16 जून : सारं जग सध्या कोरोना सारख्या अदृश्य संकटाशी सामना करत आहेत. यातच वादळ, भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन सारख्या आपत्तीही येत आहेत. या सगळ्या संकटात आता माया कॅलेंडरनं केलेल्या दाव्यानुसार येत्या 21 जूनला संपूर्ण जग नष्ट होईल. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या माया कॅलेंडरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे दावे केला जातात. याचा अभ्यास करणाऱ्या काहींनी आता 21 जूनला पृथ्वीचा विनाश होणार असल्याचं माया कॅलेंडरमध्ये नमुद केल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना आपत्ती असूनही सर्वात वाईट अद्याप येणे बाकी आहे. जगाच्या अंताचा दावा हा ग्रेगोरियन कॅलेंडर 1515 च्या आधारावर करण्यात आला आहे. त्यावेळी वर्षातील 11 दिवस कमी झाले होते. हे 11 दिवस तसे कमी वाटत असले तरी, यामुळं गेल्या 286 वर्षांत यात सतत वाढ झाली आहे. जगभर सुरू असलेल्या आपत्तींवर लक्ष ठेवणाऱ्या लोकांच्या मते काही लोक असा दावा करतात की जगाचा अंत हा 2012मध्ये होणार होता. पाओलो टागलोगुइन या वैज्ञानिकांनं केलेल्या ट्विटमुळे हा दावा आणखी दृढ झाला आहे.

पाओलो यांनी केलेल्या ट्विटनुसार आपण 2012मध्ये आहोत. ज्युलियन कॅलेंडर पाहिल्यास आपण सध्या 2012मध्ये आहोत. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जाताना आपल्याला 11 दिवसांचे नुकसान झाले आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर अस्तित्वात आल्यानंतर 268 वर्षे (1752-22020) गेली आहेत. अशाप्रकारे 11 ने गुणाकार केल्यास 2948 दिवस होतात. 2948 दिवस म्हणजे 8 वर्ष.

21 जूनला होणार जगाचा अंत? वैज्ञानिक पाओलोच्या ट्विटनंतर आता लोक म्हणतात की 21 जून 2020 प्रत्यक्षात 21 डिसेंबर 2012 आहे. मुख्य म्हणजे 2012 मध्ये असे दावा करण्यात आला होता की 21 डिसेंबर रोजी जगाचा अंत होईल. दरम्यान, हा संपूर्ण दावा सुमेरियन लोकांनी निबीरूच्या शोधानंतर झाला. निबीरू ग्रह आता पृथ्वीकडे वाटचाल करत आहे. पहिल्यांदा असा दावा केला गेला होता की जग मे 2003 मध्ये संपेल परंतु जेव्हा तसे झाले नाही, तेव्हा ही तारीख 21 डिसेंबर 2012 पर्यंत वाढविण्यात आली. आता ही 21 जून 2020ला जग संपेल असे सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या