JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / हा एलियन तर नव्हे? जर्मन प्रवाशाला विमानातून दिसला UFO, पाहा Photos

हा एलियन तर नव्हे? जर्मन प्रवाशाला विमानातून दिसला UFO, पाहा Photos

जर्मनीच्या एका प्रवाशाला विमानातून प्रवास करत असताना आकाशात चमकणारी एक गोष्ट दिसली. त्यानं कॅमेरा बाहेर काढून ती गोष्ट टिपली. ती अज्ञात गोष्ट नेमकी कुठली होती, याचा उलगडा झाला नसला तरी एलियनच्या चर्चेला त्यामुळं पुन्हा एकदा जोर आला आहे. या UFO नं तब्बल 7 मिनिटं विमानाचा पाठलाग केला आणि मग तो गायब झाला, असं प्रवाशानं सांगितलं.

0107

आतापर्यंत अनेकांनी एलियन्स असल्याचे आणि पाहिल्याचे दावे केले आहेत. मात्र प्रत्यक्षात ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. जर्मनीच्या एका प्रवाशाने एका विमान प्रवासादरम्यान एक UFO पाहिला आणि कॅमेऱ्यात कैद केला.

जाहिरात
0207

'द सन'नं छापलेल्या बातमीनुसार या युएफओनं विमानाचा 7 मिनिटं पाठलाग केल्याचं म्हटलं आहे. या प्रवाशानं ही घटना कॅमेऱ्यात चित्रित केल्यामुळं त्याचा दावा अऩेकजण गांभिर्यानं घेत आहेत.

जाहिरात
0307

ही काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी असावी, असा संशय या प्रवाशानं व्यक्त केला आहे. जमिनीपासून हजारो फूटांवर हा घटक विमानाचा पाठलाग करत होता.

जाहिरात
0407

याचा पुरावा म्हणून या जर्मन पर्यटकाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाची आणि आकार बदलणारी एक आकृती विमानाचा पाठलाग करताना दिसते.

जाहिरात
0507

या व्हिडिओत दिसणारा घटक म्हणजे प्लाझ्मा असलेला एखादा जीवही असू शकतो, असा दावा काहीजण करत आहेत.

जाहिरात
0607

विमानाच्या खिडकीबाहेर पाण्याचा थेंब होता. त्याचा आकार बदलत होता. मात्र पर्यटकाला तो एलियन वाटला असावा, असा दावाही काहींनी केला आहे.

जाहिरात
0707

हे प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळेही घडू शकतं, असंही सांगितलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या