JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Corona काळातील 7 Wonders! या देशांमध्ये नाही एकही Covid रुग्ण, पाहा PHOTOs

Corona काळातील 7 Wonders! या देशांमध्ये नाही एकही Covid रुग्ण, पाहा PHOTOs

गेल्या दोन वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र ते पूर्णतः खरं नाही. जगात असेही अनेक देश आहेत जिथं आतापर्यंत एकदाही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. जाणून घेऊया, अशा देशांविषयी.

0107

कूक आयलंड न्यूझीलंडला लागून असणारा या साऊथ पॅसिफिक देशात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोरोनाची बातमी आल्यापासूनच या देशानं आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आता त्या खुल्या करण्यात आल्या आहेत. देशातील 97 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

जाहिरात
0207

नॉर्थ कोरिया लागोपाठ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून जगाला धडकी भरवणाऱ्या उत्तर कोरियानंही देशाच्या सीमा बंद ठेवल्यामुळे या देशात कोरोनाचा विषाणू आलेला नाही. केवळ नागरिकच नव्हे, तर अन्न आणि इतर वस्तूंची आयातही उत्तर कोरियानं बंद ठेवली आहे. परिणामी देशाला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला, मात्र तरीही कोरोनाला दूर ठेवण्यात त्यांना यश आलं आहे.

जाहिरात
0307

किरीबाटी मध्य पॅरिफिकमधील या देशानंही आपल्या प्रांतात एकाही परकीय नागरिकाला येऊ दिलं नाही. कोरोनाची पहिली बातमी आल्यापासून त्यांनी देशाच्या सीमा बंद केल्याचा परिणाम दिसत असून एकही कोरोना रुग्ण या देशात आढळलेला नाही.

जाहिरात
0407

नौरू या देशानं दोन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा आता पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना आता देशात प्रवेश दिला जात आहे. मात्र या देशाच्या एकाही नागरिकाला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही.

जाहिरात
0507

नौरू या देशानं दोन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा आता पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना आता देशात प्रवेश दिला जात आहे. मात्र या देशाच्या एकाही नागरिकाला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही.

जाहिरात
0607

तुवालू या देशानंही आपल्या सीमा बंद केल्याचा परिणाम दिसला. एकही कोरोना रुग्ण न मिळाल्यामुळे एप्रिल 2021 पासून या देशानं पर्यटकांसाठी सीमा खुल्या केल्या.

जाहिरात
0707

पिटकर्न आयलंड्समध्ये अशीच परिस्थिती होती. या देशानं अजूनही आपल्या सीमा बंद ठेवल्या आहेत. 31 मार्च 2022 रोजी देशाच्या सीमा उघडल्या जातील, अशी घोषणा या देशानं केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या