रशियातील क्रिस्टीना वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 21 मुलांचा एकत्रित सांभाळ करते. या कामासाठी तिने 16 नॅनींना कामावर ठेवलं आहे. या सगळ्याजणी 24 तास मुलांवर लक्ष ठेऊन असतात. या मुलांच्या देखभालीसाठी वर्षाकाळी तिला 96,000 डॉलर म्हणजेच 72,08,265 रुपये खर्च येतो. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)
जॉर्जियाची मूळ रहिवासी क्रिस्टिना ओजटर्क हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ 24 व्या वर्षी ती 21 मुलांची आई बनली आहे. या सर्व मुलांचा जन्म सरोगसीतून झाला आहे. या मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिलेला दर महिन्याला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.
आपल्या 21 मुलांचा सांभाळ करण्यासाठी क्रिस्टिनानं 21 महिलांना कामावर ठेवलं आहे. ‘डेली मेल’मधील बातमीनुसार क्रिस्टीनाचा पती ओजटर्क हा जॉर्जियातील एक कोट्यधीश आहे.
या जोडप्यानं गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आणि या वर्षीच्या जुलै महिन्यात सरोगेट माता-पिता होण्यासाठी 142000 पाऊंड म्हणजेच 1 कोटी 46 लाख 78 हजार 156 रुपये खर्च केले.
या बाळांची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या नॅनीजवर वर्षाकाठी 96 हजार डॉलर म्हणजेच 72,08,265 रुपये खर्च होतात.
एक सर्वसामान्य आई जे करते, तेच सगळं आपण करत असल्याचं क्रिस्टीना म्हणते. फरक फक्त मुलांच्या संख्येचा आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यात आपला वेळ उत्तम जात असल्याचं ती म्हणते.
क्रिस्टीनानं सोशल मीडियावर तिच्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 1,60,000 फॉलोअर्स आहेत. बहुतांश व्हिडिओजमध्ये ती मुलांशी खेळताना आणि त्यांच्यासाठी खाऊ तयार करताना दिसते.