JOIN US
मराठी बातम्या / विदेश / आरोप मागे घेण्यास अमेरिकेचा नकार

आरोप मागे घेण्यास अमेरिकेचा नकार

20 डिसेंबर : अमेरिकेतील भारताच्या परराष्ट्र उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात असणारे आरोप मागे घेण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका यांच्यात वाद आणखी वाढला आहे. देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधातले आरोप अतिशय गंभीर असून ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता प्रश्न फक्त कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी स्पष्ट केलं आहे. भारताने देवयानीविरोधातला व्हिसा घोटाळ्याचा आरोप मागे घ्यावा. तसंच अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

devyani k 20 डिसेंबर : अमेरिकेतील भारताच्या परराष्ट्र उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात असणारे आरोप मागे घेण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका यांच्यात वाद आणखी वाढला आहे.

देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधातले आरोप अतिशय गंभीर असून ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता प्रश्न फक्त कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी स्पष्ट केलं आहे. भारताने देवयानीविरोधातला व्हिसा घोटाळ्याचा आरोप मागे घ्यावा. तसंच अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास देवयानीला 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या मार्शल्सनी देवयानी यांच्या दातांची तपासणी केली नसल्याचं अमेरिकेच्या प्रशासनाचं म्हणणंय. इतर आरोपींप्रमाणे देवयानीची चौकशी करत नसल्याचंही या मार्शल्सनं सांगितले आहे. देवयानी खोब्रागडेची मोलकरीण संगीता रिचर्डच्या वकीलांनी मात्र रिचर्ड यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या