चिवडा म्हंटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि विदर्भात चिवड्याचे खवव्ये कमी नाहीत. त्यातही यवतमाळ शहरातील आझाद मैदान संकुलात पारंपरिक चिवडा आजही तितकाच स्पेशल आहे. या चिवड्याला 10 किंवा 20 वर्ष नाही तर तब्बल इंग्रज काळापासून 86 वर्ष झालेत. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सुरू झालेला हा चिवड्याचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे. स्वर्गीय अंजनाबाई भुजाडे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे नातू याची भुजाडे सध्या चालवत असून यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.