2023 च्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये सलामीचा सामना रंगतोय तो गतविजेते इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडमध्ये. इंग्लंडची टीम सध्या फुल फॉर्मात आहे. पण किवींची फौजही तुल्यबळ मानली जातेय. मात्र भरवशाचा फलंदाज केन विल्यमसन पहिल्या सामन्यात खेळणार नसल्यानं त्याची उणीव जाणवू शकते. विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम संघाची धुरा सांभाळेल. पाहूयात इंग्लंड-न्यूझीलंड पहिल्या लढतीआधी दोन्ही संघांचा घेतलेला हा आढावा.