येत्या काही दिवसांत शक्तीची उपासना करणारा नवरात्री उत्सव सुरू होत आहे. या काळात विवध स्त्री देवतांची पूजा केली जाते. प्रत्येक भागातील या देवतांची वेगवेगळी नावे आणि त्यामागे काही खास आख्यायिका असतात. अशीच एक प्रसिद्ध देवी वर्धा नागपूर मार्गावर आहे. गाढवभुकी माता म्हणून हे मंदिर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या देवीच्या मंदिराचा इतिहास खूप जुना असून देवीच्या नावाबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात.