इडन गार्डनच्या मैदानात विराट कोहलीनं आपल्या वाढदिवसालाच सचिनच्या 49 वन डे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटनं झळकावलेलं हे शतक खास ठरलं. विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या आता 79 वर पोहोचली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराटची बॅट तुफान चालतेय. त्यामुळे यापुढच्या काळातही विराटचा फॉर्म कायम राहिला तर सचिनच्या शंभर शतकांच्याही विक्रमाला तो नक्की गवसणी घालू शकतो. N18V |