आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योग आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त, सुदृढ आणि स्वस्थ राहण्यास मदत होते. योग, प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम करून गरोदर स्त्रिया देखील स्वतःची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतात. आजकालच्या प्रदूषण युक्त वातावरणात गरोदर स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त असे काही योगासने, प्राणायामे आणि सूक्ष्म व्यायाम या संदर्भात वर्धा येथील योगशिक्षिका वनिता चलाख माहिती दिली आहे.