भारताने जगाला दिलेली महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे योग. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा याबरोबरच योग साधनेला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे. योग आणि योगसाधनेबाबत त्यांच्या अनेक फायद्याबवाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. याच योग दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूरच्या एका जवळपास चार दशक जुन्या असलेल्या योगा संस्थेकडून मोफत सूर्यनमस्कार आणि ओंकार धारणा वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.