हिंदू धर्मशास्त्रात धार्मिक विधी परंपरांना खूप महत्त्व आहे. वास्तुशांती, विवाह सोहळा अशा अनेक शुभकार्यांवेळी यज्ञ केला जातो. त्यावेळी हवन कुंडातील अग्नीत विविध घटकांची आहुती देण्याची पद्धत आहे. तर ही आहुती देताना तोंडातून स्वाहा या शब्दाचे उच्चारण केले जाते. मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? किंवा स्वाहा का म्हटले जाते असा प्रश्न बहुतेक कोणाला पडत नाही. पण धर्मशास्त्रातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व जाणून घेऊनच ती गोष्ट केली गेली पाहिजे. म्हणूनच कोल्हापुरातील धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत रांगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.