लहान मुलं म्हटलं की त्यांचं खेळायचं मस्ती करण्याचं वय असतं. पण काहीजण याला अपवाद असतात. आपल्या विशेष कौशल्याने लहान वयातच मोठे पराक्रम ते करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील चार वर्षांची चिमुरडीने असा एक विक्रम केला आहे. कनक मुंदडा असे या चिमुरडीचे नाव आहे. 65 देशांच्या राजधान्या अवघ्या 1 मिनिट 36 सेकंदात सांगून तिनं मोठा विक्रम केला आहे. त्यामुळे वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे.