सध्या राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही शहरांमध्ये रात्री गारवा आणि दुपारी ऊन अशी परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी 8 मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमानाची स्थिती काय असू शकते? याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.