राज्यात मागील आठवडाभर ढगाळ हवामान तसेच राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होतं. पावसाचा जोर ओसरल्यानंतर तापमानाचा पारा वाढत आहे. 10 मार्चपर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजामध्ये म्हटलं आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक असल्याचा अंदाज आधीच हवामान विभागाने दिला आहे. 3 मार्चपासून राज्यातील विविध शहरांमध्ये आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली असून तापमान देखील वाढत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 5 मार्च रोजी कमाल आणि किमान तापमानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊया.