राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात खूपच बदल होताना दिसत आहे. अवकाळी पाऊस ते तापमानाचा अचानक वाढता पारा आणि मध्येच ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राज्यात दिसतेय. पण आता 3 मार्चपासून राज्यातील विविध शहरांमध्ये आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली असल्यानं तापमानात पुन्हा बरेच बदल होताना पाहाला मिळत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 6 मार्च रोजी किमान आणि कमाल तापमानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊया. तर, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा तसेच इतर काही प्रमुख शहरांच्या तापमानाचा अंदाज जाणून घेऊया.