काही दिवसांपूर्वी घराबाहेर पडायचं म्हटलं तर जीव अगदी नकोसा व्हायचा. आतासुद्धा परिस्थिती फार काही वेगळी नाहीये पण मुंबई आणि कोकणातील उष्णतेत किंचित घट झाल्याचं जाणवतंय. याउलट मराठवाडा आणि विदर्भात मात्र ऊन काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. सर्वाधिक तापमान आहे छत्रपती संभाजी नगर शहराचं. इथं 19 एप्रिलला 42 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, कोल्हापूरमध्ये मात्र उन्हाळ्यात पावसाळी वातावरण आहे. इथं विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.