पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतं चाललेला आहे. मर्यादित पाणी साठ्याची धरणे शहरासाठी उपलब्ध आहेत. याचा भविष्यात ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पुण्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी पिपंरी चिंचवड येथे एकत्र येत पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केलं.