करियर म्हणजे काही ठराविक अभ्यासक्रम, ही विचारसरणी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड बदलली आहे. 2009 साली आलेल्या 3 इडियट्स या चित्रपटाचा यात मोलाचा वाटा आहे. त्यात आमिर खाननं म्हटलंय की, ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्रात करियर करायला हवं तरच यश मिळतं. हेच आता विद्यार्थी आणि पालकही फॉलो करू लागले आहेत. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर मीडिया क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढलीये. यातून अनेक पत्रकार, दिग्दर्शक, फोटोग्राफर, ऍडव्हटायझर्स, लेखक, साहित्यिक, व्हिडीओ जॉकी जन्माला येतात. हा कोर्स नेमका काय आहे, जाणून घेऊया. या क्षेत्रात करियर करण्यासाठी नेमका कोणता कोर्स निवडायला हवा याबाबत प्राध्यापक गजेंद्र देवडा यांनी माहिती दिली आहे.