Vinod Tawde Virar Bag : विरारच्या हॉटेलमध्ये सापडलेली ती पैशांची बॅग कुणाची?विरारमध्ये (Virar) पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे .या घटनेनंतर बविआ कार्यकर्ते आणि भाजपमध्ये चांगलीच जुपली आहे .तर विनोद तावडेंनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे. भ्रष्ट राजवट खतम करून टाकावी, असं साकडच उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानीला घातलं आहे. उद्धव ठाकरे तुळजापुरला सहकुटुंब दर्शनासाठी गेले आहे. त्यावेळी ते बोलत होते.