टी 20 विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबईत गुरुवारी जोरदार स्वागत झाले. लाखोच्या संख्येने मुंबईकर क्रिकेटपटूंचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आता क्रिकेटपटूंच्या सत्कारासाठी राजकीय चढाओढही सुरु झाली आहे. क्रिकेटपटूंचे अभिनंदन करणारे पोस्टर महायुतीकडून लावण्यात आले आहे. त्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आहे. त्यावरुन आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.तर प्रताप सरनाईकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.