ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी महिला पारंपरिक पेहरावासह साजशृंगार करून वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून झाडाला धाग्यानं गुंडाळून त्याची पूजा करतात. तसंच पुढचे सात जन्म हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करत असतात. मात्र या सर्व विधी वडाच्याच झाडाजवळ का केल्या जातात, याची अचूक माहिती बऱ्याच जणांना ठाऊक नसते, त्यामुळेच कोल्हापुरातील धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.