आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. पण हीच बायको पुढचे सात जन्म मिळावी, तिला दीर्घायुष्य लाभावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये काही सत्यवानांनी सावित्रीसाठी वडाची पूजा केली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला.